
अग्निशमक विभागाचा प्राथमिक निष्कर्ष
स्वयंपाक घराच्या क्षमतेपेक्षा जास्त गॅस साचल्याने दुर्घटना
दारे, खिडक्या बंद असल्याने स्फोटाची तीव्रता वाढली
साठलेल्या गॅसची क्षमता २७० पट वाढते, त्यातून दुर्घटना
ज्वलनशील वस्तूमुळे नव्हे, तर जादा गॅस साचल्याचा परिणाम
स्वयंपाक घरातील गॅस पाईपलाईनला ‘एंड कॅप’ घातली नव्हती
Kolhapur Fire Department Report Gas Blast : एलआयसी कॉलनी शेजारील मनोरंभ कॉलनीत ज्या घरात गॅसचा स्फोट झाला, त्या घरात संबंधित कंपनीकडून गॅस पाईप जोडली; पण ते काम पूर्ण होण्यापूर्वीच गॅसचा पुरवठा सुरू झाला. ज्या स्वयंपाकघरात हा प्रकार घडला तिथे क्षमतेपेक्षा जास्त गॅस साठून राहिल्याने त्याचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून व्यक्त होत आहे. या खोलीच्या खिडक्या आणि दरवाजे बंद असल्याने स्फोटाची तीव्रता वाढली आणि त्यातून ही घटना घडल्याची माहिती पुढे येत आहे.