
esakal
हायलाइट्स (मुख्य मुद्दे)
मिरजमधील तणाव निवळला: आक्षेपार्ह वक्तव्यावरून झालेल्या वादानंतर निर्माण झालेली तणावाची परिस्थिती पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे पूर्णतः नियंत्रणात आली; आजपासून सर्व व्यवहार सुरळीत.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची शहर पाहणी: अधीक्षक घुगे यांनी फौजफाट्यासह मिरज शहराची पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला आणि शांततेचे आवाहन केले.
कडक पोलिस बंदोबस्त कायम: संवेदनशील भागांत विशेष पोलिस पथकांची तैनाती, रात्री उशिरापर्यंत अधीक्षक स्वतः रस्त्यावर; कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
Miraj Crime News : मिरज शहरात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून दोन तरुणांत झालेल्या वादातून मंगळवारी (ता. ७) रात्री निर्माण झालेली तणावाची परिस्थिती आता निवळली आहे. मंगळवारी रात्रीच पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत संशयितांवर कारवाई केल्याने आज सकाळपासूनच शहरातील सर्व व्यवहार सुरळीत होते, तरीही सकाळी आणि त्यानंतर सायंकाळीही पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी फौजफाट्यासह शहराची पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला.