

Smart Meter Fire Uchgaon kolhapur
esakal
Smart Meter Short Circuit : कोल्हापूर शहराला लागून असलेल्या उचगाव येथील बाबा नगर परिसरातील मोरया अपार्टमेंटमधील एका घरात बसवलेल्या स्मार्ट मीटरला काल(ता.०८) पहाटे दोनच्या सुमारास आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नवीनच बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरला आग लागल्याने स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेची महावितरणकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.