पाटण्यात नांदते हत्तींचे "न्हानगं कुटुंब '; टस्कर आण्णाने अखेर शोधले बारक्‍याला 

 'Nhangang family' of elephants in Patna; Bringing the tusker, he finally found the barracks
'Nhangang family' of elephants in Patna; Bringing the tusker, he finally found the barracks
Updated on

कोल्हापूर  : तीन-चार महिन्यांपासून टस्कर आण्णा, धाकलं पिल्लू, बारक्‍या आणि हत्तीन माय सोबत घेऊन चंदगडातील पाटणे जंगलात फिरत आहेत. वनविभागाच्या पथकाने हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी "न्हानग कुटुंब' असे नामकरण केले आहे. त्यानुसार या कुटुंबातील टस्कर आण्णा नुकताच दोडामार्गाच्या जंगलात गेला आणि हरविलेले थोरलं पिल्लू म्हणजे बारक्‍याला घेऊन तो पाटण्याच्या जंगलात परत आला. 
या चौघांचे "न्हानगे कुंटुंब' डौलाने जंगलात फिरत आहे. अधूनमधून शेतात घुसत पिकांवर ताव मारत आहे. ही निरीक्षणे आहेत, चंदगड तालुक्‍यातील पाटणे रेंजमध्ये आलेल्या हत्तींच्या कळपाची. एक टस्कर, त्याची मादी, एक पिल्लू सोबत घेऊन पाटणे पार्ले, तिल्लारी, परिसरात वावरत होता. पूर्वी या हत्तीचे कुटुंब दोडामार्गाच्या जंगलात होते, तेव्हा त्यांचे मोठे पिल्लू दोडामार्गात खालीच राहिले. एक बारक्‍या व आईला (मादी) घेऊन टस्कर आण्णावर पाटण्यात आला. 
तीन महिने या हत्तीच्या कुटुंबाने जंगल परिसरात ठिक ठिकाणी वास्तव्य केले मात्र दोडामार्गात हरविलेल्या पिल्लाची आठवण झाली की, टस्कर आण्णा हवालदिल होत आहे. पाटणे, कळसगादे, पार्ले, गुडवळे, उमगाव येथे हत्ती व त्याच्या पिल्लाने शेतीच नुकसान केले आहे. त्यांचे पंचनामे वनविभागाने केले आहेत. हत्तीवर लक्ष ठेवताना टस्कर एक दिवस जाऊन दोडामार्गातील पिल्लू सोबत घेऊन, परत वर आला. हत्तींच्या कळपाला शोधणे सोपे जावे म्हणून वनविभागाचे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी "न्हानग्या कुटुंबा'ची उपमा दिली आहे. त्यानुसार त्यांची नावेही ठेवली आहेत. वन्यजीव आपलाच सगेसोबती असल्याने त्याचे संरक्षण करणे जबाबदारी आहे. ती आम्ही पार पाडू, मात्र हत्तीकडून झालेली नुकसानभरपाई वनविभाग रितसर देत असतो, मात्र कोणी परस्पर हत्तींना इजा पोचविण्याचा प्रयत्न करू नये'' 


"" कळपावर लक्ष ठेवणे सोपे व्हावे यासाठी "न्हानगं कुटुंब' व टस्कर म्हणजे "आण्णा', "बारक्‍या 1' बारक्‍या 2 म्हणजे दोन पिल्ले अशी नावे दिली आहेत. हत्तींच्या हालचालींवरून त्याचे अर्थ लावतो. म्हणून हत्तींचा मार्ग व हालचालींचा अंदाज येतो. जेणे करून हत्ती जंगल सोडून बाहेर आल्यास त्यांना तातडीने जंगलात पुन्हा परतविण्यासाठी निरीक्षणे उपयोगी पडतात. 
- दत्ता पाटील, वनपाल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com