Nipani Constituency : 'राष्ट्रवादीच्या नव्या चेहऱ्याला संधी देणार'

निपाणी शहरातही ‘राष्ट्रवादी’चा नवा चेहरा असलेल्या उत्तम पाटील यांना उच्चांकी मते देऊ.
NCP Satara
NCP Satara esakal
Summary

नगरसेवक रवींद्र शिंदे यांनी, अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला आहे. पुढील काळात उत्तम पाटील (Uttam Patil) यांना मताधिक्याने निवडून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

निपाणी (कर्नाटक) : निपाणी मतदारसंघात (Nipani Constituency) गेली पाच वर्षे उत्तम पाटील यांनी कोरोना, महापूर काळात अरिहंत उद्योगसमूहाच्या माध्यमातून केलेले कार्य वाखाण्याजोगे आहे. कोणतेही पद नसताना या व्यक्तीच्या माध्यमातून मतदारसंघात आजवर झालेली कामे थक्क करणारी आहेत. अशा या युवा नेतृत्वाला विधानसभेत पाठविण्याचा निर्णय मतदारसंघाने घेतला आहे. त्यामुळे निपाणी शहरातही ‘राष्ट्रवादी’चा नवा चेहरा असलेल्या उत्तम पाटील यांना उच्चांकी मते देऊ, अशी ग्वाही गोपाळ नाईक यांनी दिली.

येथील सटवाई रोड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचार प्रसंगी ते (Gopal Naik) बोलत होते. नगरसेवक रवींद्र शिंदे यांनी, अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला आहे. पुढील काळात उत्तम पाटील (Uttam Patil) यांना मताधिक्याने निवडून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

NCP Satara
Karnataka Election : आम्हीच मुस्लिमांचं आरक्षण संपुष्टात आणलं; भरसभेत अमित शहांनी छातीठोकपणे सांगितलं

या वेळी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, गणी पटेल, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवडर, नगरसेवक संजय सांगावकर, संजय पावले, डॉ. जसराज गिरे, दिलीप पठाडे, दीपक सावंत, प्रशांत गुंडे, इम्रान मकानदार, शिरीष कमते, अवी सांगावकर, सचिन पोवार, सुनील राऊत, दत्तात्रय नाईक यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.

NCP Satara
Karnataka : 'या' काँग्रेस नेत्यांचा पराभव करण्यासाठी अमित शहांचा मास्टर प्लान; भाजप रणनितीकारांनी लावली ताकद

आडके प्लॉटमध्ये प्रचार

येथील राजनगर आडके प्लॉटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारार्थ कोपरा सभा घेऊन त्यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी नगरसेवक संजय पावले, शेरू बडेघर, सुनील शेलार, दीपक सावंत, ए. एच. मोतीवाला, यासीन अत्तार, विष्णू मोहन पावले, रवी पावले, योगेश जाधव, मज्जित सय्यद, इब्राहिम अत्तार, पांडुरंग भोई, नितीन कोपार्डे, भूषण खैरे, राहुल परदेशी, सूरज पाटील, सुनील शिंदे, रामा किल्लेदार, स्वराज्य पोटे, रणजित पोटे यांच्यासह उत्तम पाटीलप्रेमी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com