esakal | महिला दिन : 'चला, दामिनी होवू या' मानवी साखळीला उत्स्फूर्त प्रतिसाद...

बोलून बातमी शोधा

nirbhya human chain rally recognized by sakal media in kolhapur

ऐतिहासिक बिंदू चौकात सकाळी आठ वाजता ही सारी मंडळी एकत्र येत एकमेकांचे हात हातात गुंफून निर्भय बनण्याचा वज्रनिर्धार करण्यात आला. 

महिला दिन : 'चला, दामिनी होवू या' मानवी साखळीला उत्स्फूर्त प्रतिसाद...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - 'सकाळ' माध्यम समूहाच्या पुढाकाराने स्त्री सन्मानार्थ आज 'चला, दामिनी होवू या' मानवी साखळीचे आयोजन केले होते. या उपक्रमाला विविध महिला संस्था, संघटनांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ऐतिहासिक बिंदू चौकात सकाळी आठ वाजता एकत्र येत एकमेकांचे हात हातात गुंफून निर्भय बनण्याचा वज्रनिर्धार यावेळी करण्यात आला. 

यंदाच्या महिला दिनाच्या पार्श्‍वभुमीवर हा उपक्रम झाला. यावेळी शाहिरा दीप्ती सावंत व शाहिरा तृप्ती सावंत स्त्री सन्मानाची मशाल मनामनांत पेटवली. एव्हरेस्ट मोहिमेसाठी जय्यत तयारी करणारी आणि लवकरच मोहिमेला प्रारंभ करणारी करवीरकन्या कस्तुरी सावेकर हिने यावेळी सर्व मुली व महिलांना निर्भय होवून दामिनी बनण्याची शपथ दिली. 

बिंदू चौकात सकाळी आठपासून मुली व महिला एकवटल्या. साडेआठला त्या एकमेकांच्या हातात हात गुंफून आणि मानवी साखळी केली. त्यानंतर पुन्हा साऱ्याजणी निर्भय बनण्याची शपथ घेतली. महिला सन्मानार्थ विविध घोषवाक्‍ये, पोस्टर्स, फलक घेवून विविध महिला संस्था, संघटनाही सहभागी झाल्या होत्या. 

यांचा होता सहभाग...

 निर्भया पथक, महिला पोलिस, व्हाईट आर्मी, जिजाऊ ब्रिगेड, एनसीसी छात्र, महिला वकील संघटना,  अवनि-एकटी संस्था, उडान मंच,  चाईल्डलाईन, कॉमर्स कॉलेज, गोखले कॉलेज, रग्बी खेळाडू संघटना, पारिचारिका संघटना, महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियन, आनंदीबाई महिला संस्था.