
Police Action Ganpati 2025 : कर्णकर्कश साऊंड सिस्टीमवर निर्बंध घालण्याबरोबरच डोळ्यांना घातक ठरणाऱ्या ‘लेसर’ वापरावरील बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश शनिवारी जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना दिले.
जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांची बैठक मुख्यालयात झाली. त्यात गणेशोत्सवातील आगमन मिरवणुकांवेळी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपायांवर चर्चा झाली. काही मंडळे २० जुलैपासूनच ‘श्रीं’ची मूर्ती वाजत-गाजत आणतात. अशा सर्व मिरवणुकांवर लक्ष राहणार आहे.