
कोल्हापूर : एकीकडे कामगारांची संख्या कमी असल्याने शहरातील सफाईच्या कामांना ‘खो’ बसत आहे. तर दुसरीकडे महापालिका प्रशासनाच्या संथ कारभारामुळे नवीन ५३ कामगारांची नियुक्ती अंतिम टप्प्यावर येऊन रखडली आहे. त्यात लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार ४०, तर अनुकंपा तत्त्वावरील १३ वारस महापालिकेच्या लालफितीच्या कारभारात अडकले आहेत.