
दारूसाठी सावत्र आईचा खून केल्याच्या आरोपात अटक, कोल्हापुरातील घटना
esakal
Kolhapur Police Action : दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणाने आज आपल्या सावत्र आईचा खलबत्ता डोक्यात घालून खून केला. हा प्रकार आज सकाळी भारतनगरमध्ये घडला. सावित्रीबाई अरुण निकम (वय ५३) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी विजय अरुण निकम (वय ३५, रा. भारतनगर, साळोखे पार्कजवळ, राजेंद्रनगर परिसर) याला अटक केली.