धक्कादायक: कारागृहात पोलिसाच्या बुटातच सापडल्या चिठ्ठ्या

notes found in policeman shoes socks at Kalamba Central Jail crime marathi news
notes found in policeman shoes socks at Kalamba Central Jail crime marathi news
Updated on

कोल्हापूर  : कळंबा मध्यवर्ती कारागृहात पोलिस शिपायाच्या बुटाच्या सॉक्‍समध्ये दोन चिठ्ठ्या सापडल्या आहेत. त्यामध्ये ‘माझे अर्जंट काम आहे, ही चिठ्ठी घेऊन येणाऱ्यांना पंचवीस हजार रुपये द्यावेत’, असा मजकूर लिहिल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे या चिठ्ठ्यांवर ज्या कैद्यांची नावे आहेत, त्यांनी या चिठ्ठ्या लिहिल्याच नसल्याची माहिती अधीक्षक चंद्रमणी इंदुलकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. ज्या संबंधित पोलिस शिपायाकडून हा प्रकार घडला आहे, त्याच्या चौकशीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविल्याचेही अधीक्षक इंदुलकर यांनी सांगितले.


अधीक्षक इंदुलकर म्हणाले, की कारागृहात मोबाइलसह इतर वस्तू येऊ नयेत, यासाठी मुंबईसह राज्यातील सर्वच कारागृहात दक्षता घेतली जात आहे. काही पोलिसांकडून कैद्यांच्या चिठ्ठ्या नातेवाईकांना पाठविल्या जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. म्हणून शनिवारी सायंकाळी ड्यूटी बदलताना पोलिसांची झडती घेतली. त्यामुळे प्रत्येकाची झडती घेतली, तेव्हा पोलिस शिपायाच्या उजव्या पायाच्या बुटातील सॉक्‍समध्ये दोन चिठ्ठ्या आढळून आल्या. त्याची चौकशी केली असता संबंधित कैद्यांनी या चिठ्ठ्या आमच्या नसल्याचे सांगितले. तसेच चिठ्ठीवरील सही सुद्धा त्यांची नसल्याची माहिती पुढे आली आहे.  

‘संबंधित पोलिस शिपायाच्या चौकशीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठविला आहे. खातेअंतर्गत कारवाई केली जाईल.’ 
  - चंद्रमणी इंदुलकर, अधीक्षक, कळंबा कारागृह

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com