esakal | क्रीडा प्रबोधिनी आयलीगच्या रणांगणात
sakal

बोलून बातमी शोधा

Now Krida Prabodhani participate In Indian Football league

भारतीय फुटबॉलमधील अव्वल मानल्या जाणाऱ्या इंडियन फुटबॉल लीग (आयलीग) स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने घेतला आहे. 13 आणि 15 वर्षाखालील गटात सहभागी होणाऱ्या क्रीडा प्रबोधिनी संघाची निवड केली जाणार आहे. त्यासाठी राज्यात सात ठिकाणी निवड चाचणी होईल.

क्रीडा प्रबोधिनी आयलीगच्या रणांगणात

sakal_logo
By
दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : भारतीय फुटबॉलमधील अव्वल मानल्या जाणाऱ्या इंडियन फुटबॉल लीग (आयलीग) स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने घेतला आहे. 13 आणि 15 वर्षाखालील गटात सहभागी होणाऱ्या क्रीडा प्रबोधिनी संघाची निवड केली जाणार आहे. त्यासाठी राज्यात सात ठिकाणी निवड चाचणी होईल. यात नाशिक, औरंगाबाद, लातूर, नागपूर, यवतमाळ, पुणे, मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी या चाचण्या होणार आहेत. यानिर्णयाने राज्यातील प्रतिभावान फुटबॉलपट्टूंना राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची नवी संधी मिळणार आहे.

जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) भारतीय फुटबॉलचा दर्जा सुधारावा यासाठी कुमार आणि युवा फुटबॉल पट्टूंना सामने खेळण्याच्या अधिक संधी द्याव्यात, अशा सूचना दिल्या.

त्यामुळेच भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) पाच वर्षापूर्वी वरिष्ठ गटाच्या धर्तीवर 13,15 आणि 18 वर्षाखालील आयलीग स्पर्धा सुरु केली आहे. या स्पर्धेमुळे नवोदित खेळाडू मोठ्या संख्येने आकर्षिक होत आहेत. कोलकत्ता, दिल्ली, मुंबई, गोवा, बंगळूर,चेन्नई, केरळ या ठिकाणी विभागीय स्पर्धा होवून विजेते संघ मुख्य फेरीसाठी पात्र ठरतात. 

शासनाच्या क्रिडा विभागामार्फत पुण्याच्या बालेवाडी शिवछत्रपती क्रिडा प्रबोधिनी कार्यरत आहे. हा प्रबोधिनीचा संघ पुढील हंगामात आयलीग मध्ये सहभागी होणार असल्याचे क्रिडा व युवक सेवा संचलनालयाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया याने परिपत्रकातून कळविले आहे. 13 वर्षे वयोगटासाठी 1 जानेवारी 2008 ते 31 डिसेंबर 2009 दरम्यान जन्मलेले खेळाडू पात्र आहेत. पंधरा वर्षाखालील गटासाठी 1 जानेवारी 2006 ते 31 डिसेंबर 2007 मध्ये जन्मदिनांक असणारे खेळाडू सहभागी होऊ शकतील. 

निवड चाचण्यांचा कार्यक्रम, दिनांक 
- नाशिक : 28 व 29 
- औरंगाबाद व लातूर- 2 ते 3 मार्च 
- नागपूर- 5 व 6 मार्च 
- यवतमाळ- 7 व 8 मार्च 
- पूणे- 12 व 13 मार्च 
- मुंबई- 16 व 17 मार्च 
- कोल्हापूर- 19 व 20 मार्च 

वरिष्ठ संघांचे दारे खुली
यापूर्वी क्रीडा प्रबोधिनीचे खेळाडू इतर व्यावसायिक संघातून खेळत होते. आता मात्र या निर्णयामुळे राज्यातील प्रतिभावान खेळाडूंना क्रीडा प्रबोधिनीच्या स्वतःच्या संघाच्या माध्यमातून इंडियन सुपर लीग आणि आयलीग वरिष्ठ संघांचे दारे खुली होतील. 
- धीरज मिश्रा, राज्य फुटबॉल प्रशिक्षक, पुणे