नृसिंहवाडी: येथे दत्त जयंती उत्सवाची चाहूल लागताच सर्वत्र भक्तिभावाने नटलेल्या वातावरणात उत्सवाची रंगत अधिक खुलते. ऐतिहासिक संदर्भ पाहिल्यास लक्षात येते की, कोल्हापूरच्या छत्रपतींच्या परंपरेतून हा उत्सव सोहळा होतो..छत्रपतींचे उपाध्ये म्हणून ओळखले जाणारे नृसिंहवाडीचे पुजारी यांना ‘राजोपाध्ये’ हा विशेष मान प्राप्त झाला आहे. दत्त देवस्थानच्या सहकार्याने दहा दिवसांची सजावट, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्याचा मान मानकऱ्यांकडे असतो. यासाठी ते आतापासूनच परिश्रम घेत आहेत..सोनुर्ली जत्रोत्सव विशेष.यावर्षी प्रत्येक देवस्थानचे माजी सचिव विनोद पुजारी, दत्तात्रय पुजारी, नारायण पुजारी आणि संजय पुजारी या मानकरी परिवाराला हा मान मिळाला आहे. दहा दिवसांच्या अखंड भक्तिरसात न्हालेल्या या उत्सवात भाविकांसाठी अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी देण्यासाठी मानकरी तयारी करत आहेत..दत्त जन्मकाळ सोहळ्याची अनुभूतीउत्सवातील अत्युच्च क्षण म्हणजे ४ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता होणारा ‘दत्त जन्मकाळ’ सोहळा. मंदिराच्या गाभाऱ्यात भक्तिरसाने भारलेले वातावरण, सनईचे सूर आणि ‘दत्त दिगंबरा’च्या घोषणांनी परिसर दुमदुमतो. कीर्तनाच्यादरम्यान हा सोहळा होतो. या वेळी बुक्का उधळला जातो, घंटानादाने गाभारा दुमदुमतो. .Alandi Wari : आळंदी वारीचा महासोहळा १२ नोव्हेंबरपासून! कार्तिक एकादशी, संजीवन समाधी दिनाच्या मुख्य कार्यक्रमाच्या तारखा जाहीर.आरतीच्या तालावर भाविकांचा सहभाग जाणवतो. ‘उद्धरी गुरुराया हा पाळणा...’ अशी स्तुती अर्पण केली जाते. पाळण्यात ब्रह्मा, विष्णू, महेश स्वरूपातील बाळरूपे ठेवली जातात. धूप, दीप, नैवेद्य अर्पण केले जाते. पुढे टेंबे स्वामींचे ‘घोरातकष्टा’ स्तोत्र सादर होते. ‘श्री गुरुदेव दत्त’ जयघोषात पाळणा हलवला जातो. हा क्षण भाविकांना आयुष्यभर स्मरणात राहील, असा आध्यात्मिक अनुभव ठरतो. या सोहळ्यासाठीही मानकरी नियोजनात गुंतले आहेत. जन्मकाळानंतर मानकऱ्यांच्या.निवासस्थानी पाळणाजन्मकाळ सोहळ्यानंतर परंपरागत पद्धतीने मानकरी यांच्या निवासस्थानी पाळणा भक्त दर्शनासाठी ठेवला जातो. पुढील दिवसांत हजारो भाविकांचा ओघ सुरू राहतो. दर्शन, आरती, प्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या प्रवाहामुळे हे घर जणू एका लहान मंदिराचे स्वरूप धारण करते..दहा दिवसांचा हा धार्मिक सोहळा भक्तांना आध्यात्मिक उन्नती देणारा असतो. मानकरीपद हा सन्मान नसून ‘सेवा हीच दत्तपूजा’ या भावनेचे प्रतीक आहे. या उत्सवातून भाविकांना भक्तीची प्रेरणा, आध्यात्मिक मार्गदर्शन, संस्कृतीचा परिचय आणि दत्तभक्तीचे तेज अनुभवायला मिळते. नृसिंहवाडी दत्त जयंती उत्सव हा परंपरेचा, श्रद्धेचा आणि सेवाभावाचा जागृत दीप आहे. यावर्षी मानकरी म्हणून आम्ही पुजारी परिवार हा दीप पूर्वीप्रमाणेच तेजोमय ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत.- विनोद पुजारी, उत्सवाचे मानकरी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.