esakal | कोल्हापूर - देशात फडकला पन्‍हाळा पालिकेचा झेंडा 
sakal

बोलून बातमी शोधा

Number one in the clean survey of Panhala Municipal Council

पन्‍हाळा नगरपरिषदेचा पहिला क्रमांक आल्‍याचे समजताच गडावर आनंदाचे वातावरण पसरले.

कोल्हापूर - देशात फडकला पन्‍हाळा पालिकेचा झेंडा 

sakal_logo
By
आनंद जगताप

पन्‍हाळा - पन्‍हाळा नगरपरिषदेने स्‍वच्‍छ सर्वेक्षणमध्‍ये पहिला क्रमांक पटकावून देशात झेंडा  फडकावला आहे. थंड हवेचे ठिकाण, ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आणि व्‍हॉलिबॉलची नगरी यासाठी प्रसिध्‍द असलेल्‍या पन्‍हाळा नगरीच्‍या लौकिकात स्‍वच्‍छ सर्वेक्षणचा आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

आज सकाळी पन्‍हाळा नगरपरिषदेचा पहिला क्रमांक आल्‍याचे समजताच गडावर आनंदाचे वातावरण पसरले. नागरिकांनी तसेच नगरपरिषद प्रशासनाने फटाक्‍यांची आतषबाजी करून एकमेंकाना शुभेच्‍छा देत आनंद व्‍यक्‍त केला. पन्‍हाळ गडाला थंड हवेचे वरदान आणि ऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभल्‍याने 1956 साली खास बाब म्‍हणून नगरपालिकेचा दर्जा मिळाला. शहराची लोकसंख्‍या अवघी साडेतीन हजार आहे. गडावर नैसर्गिक चढउतार असल्‍याने गड नेहमी स्‍वच्‍छ असतो, पण इथे येणा-या पर्यटकांची संख्‍या मोठी असल्‍याने नगरपरिषदेला स्‍वच्‍छतेला प्राधान्‍य दयावे लागते. 2017-18 साली पन्‍हाळा पालिकेचा देशात 46  वा तर 2018-19 मध्‍ये स्‍वच्‍छतेत 17 वा क्रमांक आला होता. यावर्षी पश्चिम विभागात पहिला क्रमांक मिळवायचाच असा निश्‍चय करून नगराध्‍यक्षा रुपाली  धडेल, मुख्‍याधिकारी  डॉ. कैलास चव्‍हाण, सर्व नगरसेवक आणि प्रशासन कामाला लागले, नागरिकांनीही त्‍यांना साथ दिली.

 केंद्रिय स्‍वच्‍छ सर्वेक्षण अभियानात पन्‍हाळा नगरपरिषदेसह नवी मुंबई,  कराड, सासवड, लोणावळा, रत्‍नागिरी, शिर्डी, हिंगोली, बल्‍लारपूर, शेगांव, वीटा, इंदापूर, वरोरा, अकोला, जेजूरी आणि देहूरोड कंटेंन्‍मेंट नगरपरिषदांना मानांकन मिळाले होते. यात पन्‍हाळ्याची पाहणी जानेवारी 2020 मध्‍ये झाली. सर्व नगरपालिकेत 25 हजारच्‍या आत लोकसंख्‍या असलेली पन्‍हाळा ही एकमेव नगरपरिषद आहे. त्‍यामुळे पहिल्‍या क्रमांकाची अपेक्षा होती, त्‍याप्रमाणे आज थ्रीस्‍टार मानांकन मिळालेल्‍या पन्‍हाळा पालिकेस कचरा संकलन, विलगीकरण आणि  कचऱ्यावर प्रक्रिया  करण्‍यात 100 टक्‍के यश मिळाल्‍याने प्रथम क्रमांक मिळाल्‍याचे केंद्राकडून जाहीर करण्‍यात आले. 

हे पण वाचा...अखेर‘ लालपरी’धावली ; कसे असणार कोल्हापूर आगाराचे वेळापत्रक?

हे सर्वांचे सामुहिक यश

पन्‍हाळा पालिकेचे नाव देशपातळीवर नोंदले गेले. पालिकेला स्‍वच्‍छ सर्वेक्षणचा पश्चिम विभागात प्रथम क्रमांक आला तो केवळ  नागरिकांचे  सहकार्य, प्रशासन  आणि  नगरसेवकांसह स्‍वचछता कर्मचा-यांची चिकाटी  यामुळेच. त्‍यामुळे नगराध्‍यक्षा या नात्‍याने या सर्वांचाच मला अभिमान आहे. 

- रुपाली धडेल, नगराध्‍यक्षा 


संपादन - धनाजी सुर्वे 
 

loading image
go to top