
Village Road Dispute
esakal
Maharashtra Rural Roads : आता गाव, पाणंद रस्त्यांना ओळख क्रमांक मिळणार आहेत. त्यामुळे रस्त्याच्या वापरावरुन होणार वाद कमी होणार आहेत. त्याचबरोबर या रस्त्यांवरील अतिक्रमणे ही निघणार आहेत. तसेच गावात किती पाणंद, गाडी व ग्रामीण मार्ग याची यादी गावपातळीवर तलाठी दफ्तरी उपलब्ध राहणार आहे. याबाबतची कार्यवाही छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ता. १७ सप्टेंबर ते ता. २ ऑक्टोबर या कालावधित सेवा पंधरवड्यात करण्यात येणार आहे. त्यानुसार महसूल विभाग व भूमि अभिलेख विभागाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे.