आरटीओ कार्यालय एकदम टकाटक..

Oh wow New look for  kolhapur "RTO" office.
Oh wow New look for kolhapur "RTO" office.
Updated on

कोल्हापूर :  प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) आता कॉर्पोरेट लूक येत आहे. तब्बल अडीच कोटींच्या निधीतून हे काम सुरू असून, लवकरच ते पूर्णत्वाकडे जाणार आहे. लॉकडाउनमुळे मिळालेल्या रिकाम्या वेळेमुळे हे काम सुरू आहे.

कॉर्पोरेट लूकमुळे कागदपत्रे अपडेट ठेवण्यासह कार्यालयात प्रशस्त वातावरण राहण्यास मदत होणार आहे.  प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे टिपिकल शासकीय कार्यालय होते. येथे अस्ताव्यस्थपणे कापड्यात बांधलेली कागदपत्रे ठिकठिकाणी होती. टिपिकल सरकारी जुन्या टेबल खुर्च्यां होत्या. व्हरांड्यातील फरशा निघालेल्या होत्या. येथील असुविधांचा पाढा येथे येणाऱ्या ग्राहकांकडून रोज वाचला जात होता. अखेर 2017-18 मध्ये अडीच कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यानंतर या कामाला फारशी गती आली नव्हती, मात्र आता लॉकडाउनमुळे हे काम वेगात झाले आहे. कार्यालयात कोणीही नसल्यामुळे अडथळे कमी झाले. यामुळेच येथील फर्निचर बदलणे, व्हरांड्यातील फरशी बसविणे, सिलिंग करण्याचे कामे पूर्ण झाली. पूर्वी भिंतीवर लोंबत असलेल्या जुन्या लाईटचे वायरींगसुद्धा आता बदलले आहे. सध्या इमारतीच्या आतील काम पूर्णत्वाकडे पोहचत आहे. फर्निचर तयार झाले आहे. आता इमारतीच्या बाहेरील काम सुरू झाले आहे. इमारत रंगवली जाणार आहे. संपूर्ण कार्यालयाचे कंपाऊंड नव्याने तयार होणार आहे. पार्किंगच्या जागेतही बदल केला असून, ती प्रशस्त आणि रंगरंगोटी केलेली असणार आहे. साधारण दोन-तीन महिन्यांत हे सर्व काम पूर्ण होईल, असा विश्‍वास प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी व्यक्त केला.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com