esakal | डॉ. आंबेडकरांचा सहवास लाभलेल्या 'त्या' वृद्धेचे निधन 
sakal

बोलून बातमी शोधा

old woman associated with dr. Ambedkar died

चिक्कोडी येथील न्यायालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले होते.

डॉ. आंबेडकरांचा सहवास लाभलेल्या 'त्या' वृद्धेचे निधन 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चिक्कोडी : औरवाड येथील मंदिर कमिटी आणि पटेल कुटुंबीय यांच्यातील खटला चालवण्यासाठी चिक्कोडी येथील न्यायालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले होते. त्यावेळी देखभाल व सेवा करण्याचे भाग्य लाभलेल्या करोशी (ता. चिक्कोडी) येथील शतायुषी जिगणबी बापूलाल पटेल (वय 108) यांचे मंगळवारी (ता. 2) रात्री निधन झाले. त्यांच्या मागे चार मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

औरवाड (जि. कोल्हापूर) येथील एका मंदिर कमिटी आणि बापूलाल पटेल कुटुंबीयांत जमिनीबाबतचा खटला चिक्कोडी न्यायालयात सुरू होता. तत्कालीन मुंबई हायकोर्टात प्रसिद्ध असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पटेल कुटुंबीयांची बाजू मांडण्याची जबाबदारी देण्यात आली होती. हा खटला लढविण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी चिक्कोडी येथे भेट दिली होती. त्यावेळी त्यांच्या निवास व जेवण-खाण्याची सोय करोशी येथील बापूलाल पटेल यांच्या घरीच केली होती.

त्यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या सेवेचे भाग्य त्यांना लाभले होते. वयाची शंभरी पार केली तरी जिगणबी यांची प्रकृती अखेरपर्यंत ठणठणीत होती. त्यांच्या जाण्याने चिक्कोडी तालुक्‍यातील डॉ. आंबेडकरांचा सहवास लाभलेले एक व्यक्तिमत्व हरपले. दरम्यान, काही वर्षापूर्वी डॉ. आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर व बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती मायावती यांनीही करोशीला भेट देऊन जिगणबी पटेल यांची भेट घेतली होती. 

डॉ. आंबेडकरांनी ठेवले "मुन्नी' हे नाव 
डॉ. आंबेडकर यांनी करोशी येथे पटेल यांच्या घरी निवास केला होता. त्यावेळी जिगणबी या नऊ वर्षाच्या होत्या. त्यांनी डॉ. आंबेडकर यांची सेवा केली व डॉ. आंबेडकर त्यांना "मुन्नी' या नावाने हाक मारायचे. 

loading image