Omkar Elephant : एका ओंकार हत्तीने दोन राज्यांना आणलं जेरीस, थेट अंगणात आल्याने तारांबळ; वनविभाग सपशेल अपयशी

Omkar Elephant Goa : गोव्याच्या हद्दीत तांबोसे गावात स्थिरावलेल्या ओंकार हत्तीने आज सायंकाळी तेरेखोल नदी पार करत मडुरा-सातोसे सीमेवर असलेल्या रेखवाडीत आपली हजेरी लावली.
Omkar Elephant

Omkar Elephant

esakal

Updated on
Summary

गेल्या काही दिवसांपासून गोव्यातील तांबोसे गावात असलेला ओंकार हत्ती आज तेरेखोल नदी पार करून सातोसे-मडुरा सीमेवरील रेखवाडीमध्ये दाखल झाला; त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि पळापळ झाली.

ओंकार हत्तीने परिसरातील भातशेती व भाजीपाला शेतीचे मोठे नुकसान केले असून, त्याला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे; ‘ओंकार’ म्हणून हाक मारल्यावर तो प्रतिसाद देतो अशी चर्चा स्थानिकांत आहे.

सिंधुदुर्ग व गोवा वनविभागाचे पथक हत्तीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून असून, वस्तीत येण्यापासून रोखण्यासाठी फटाके व अन्य उपाययोजना सुरू आहेत.

Goa Maharashtra Border Elephant : गेले काही दिवस गोव्याच्या हद्दीत तांबोसे गावात स्थिरावलेल्या ओंकार हत्तीने आज सायंकाळी तेरेखोल नदी पार करत मडुरा-सातोसे सीमेवर असलेल्या रेखवाडीत आपली हजेरी लावली. वाडीतील अनेकांच्या अंगणात हत्ती दाखल झाल्यामुळे सर्वांचीच पळापळ झाली. हत्तीला पाहण्यासाठी परिसरात गर्दी जमल्याने वनविभागाची तारांबळ उडाली. ओंकारचा वावर सध्या सातोसे-मडुरे येथील जंगल परिसरात असून, वनविभाग त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com