कोल्हापूर : ‘राजकारणात काही प्रसंग येत असतात. त्यांना आपण धीरोदात्तपणे सामोरे जायचे असते. संयमाने घ्यायचे असते. आक्रस्ताळेपणा करायचा नसतो. वैयक्तिक मैत्री, पक्षीय राजकारण आणि तात्त्विक राजकारण हे वेगवेगळे विषय असतात. हे आमदार सतेज पाटील यांनी लक्षात घ्यावे. आज मैत्री दिन आहे. माझा सल्ला ते ऐकतील, अशी आशा आहे. त्यांची आणि माझी मैत्री कायम राहणार आहे’, अशी टिप्पणी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. कागल येथे अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.