
कोल्हापूर : महापालिकेच्या घरफाळा विभागाकडे एका दिवसात पावणेदोन कोटी रुपये इतका महसूल जमा झाला आहे. ऑनलाईन आणि थेट नागरी सुविधा केंद्राकडे रोखीने जमा करुन कराचा हा भरणा नागरिकांनी केला आहे. गेल्या चार दिवसात चार कोटी 42 हजार रुपये तर आतापर्यंत 17 कोटी 50 लाख इतकी रक्कम जमा झाली आहे. या करामुळे महापालिकेला अर्थिकदृष्ट्या दिलासा मिळाला आहे.
घरफाळा विभागांकडून नियमित वेळेत कर भरणा करदात्यांना 30 जूनपर्यंत 6 टक्के सवलत आहे. त्यानंतर जुलै ते सप्टेंबर पर्यंत चार टक्के आणि स्पटेंबर ते डिसेंबर पर्यंत 2 टक्के सवलत राहणार आहे. त्यामुळे या सवलतीच्या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले होते. लॉकडाउनमध्ये सर्व वसूली ठप्पच होती. त्याचबरोबर लोकांच्याही समस्या असल्याने महापालिकेने वसूली मोहिमही थांबविली होती. आता लॉकडाउनमध्ये शिथीलता आल्याने आणि जनजीवन टप्याटप्याने सुरळीत करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर महापालिकेने पुन्हा नागरिकांना घरफाळा भरण्याचे आवाहन केले होते.
नागरिकांनीही याला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे महापालकेच्या तिजोरीत आता चांगली रक्कम जमा झाली आहे. आज एकाच दिवसात एक कोटी 75 लाख जमा झाले महानगरपालिकाच्या तिजोरीत घरफळा जमे पोटी आजअखेर सुमारे 17 कोटी 50 लाख इतकी विक्रमी रक्कम जमा झाली आहे. हि जमा गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे गतवर्षी याच तारखेला नऊ कोटी 38 लाख इतकी रक्कम जमा झाली होती. नागरिकांनी सहा टक्के सवलत योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याच्या दृष्टीने आपला घरफाळा लवकरात लवकर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ.कलशेट्टी तसेच करनिर्धारक व संग्राहक संजय भोसले यांनी केले आहे.
चाळीस हजार जणांनी घेतला लाभ...
महापालिकेने जाहीर केलेल्या सहा टक्के मिळकत सवलतीचा लाभ शहरातील सुमारे 40 हजार मिळकतधारकांनी घेतला आहे. महापालिकेच्या विविध नागरी सुविधा केंद्रामध्ये जावून 30 हजार 194 मिळकतधारकांनी कराचा भरणा केला. तर ऑनलाईनव्दारे शहरातील 10 हजार 325 नागरिकांनी घेतला आहे. सोमवारी (ता. 22) 75 लाख 81 हजार, मंगळवारी (ता. 23) 78 लाख 46 हजार, बुधवारी (ता. 24) 71 लाख 7 हजार तर आज गुरुवारी (ता. 25) एक कोटी 75 लाख ररुपये जमा झाले.
दृष्टिक्षेप
- महापालिकेला अर्थिकदृष्ट्या दिलासा
- लॉकडाउनमध्ये होती सर्वच वसुली ठप्प
- आजअखेर सुमारे 17 कोटी 50 लाख रक्कम जमा
- 30 जून पर्यंत राहणार 6 टक्के सवलत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.