
चिंताजनक: एका महिन्यात 450 जणांचा बळी; व्याधीग्रस्तांनो सावधान!
कोल्हापूर: जिल्ह्यात कोरोनाने महिनाभरात 450 वर व्याधीग्रस्तांचे बळी घेतले. त्यामुळे व्याधीग्रस्तांसाठी कोरोना जीवघेणा ठरतो आहे. त्यामुळे त्यांनी खबरदारी घेणेच हिताचे ठरेल. ज्यांचा कोरोना संसर्ग नाकातून घशात, घशातून फुफ्फुसात गेला. फुप्फुसात संसर्ग पसरल्यानंतरच अनेक जण उपचाराला आले. त्यांची प्रकृती गंभीर बनल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. अशा गंभीर बाधितांमध्ये मधुमेह, हृदयविकार, फुफ्फुसाचा गंभीर संसर्ग, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड व यकृत निकामी, तीव्र कर्करोग आदी गंभीर आजार ज्यांना दीर्घकाळ आहेत, अशा व्यक्तींचा कोरोनाबाधिताचे उपचार घेताना मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या वर्षी ज्या कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला, त्यातील 90 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण 60 वर्षांवरील होते. मात्र, यंदा आलेल्या कोरोनाचा स्ट्रेंथ अधिक तीव्र आहे. त्यामुळे 60 वर्षांखालील व्यक्तींचे मृत्यूचे प्रमाणही 15 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. यातही 48 वर्षांखालील 23 व्यक्तींचाही मृत्यू झाला.
हेही वाचा- एसटी कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात;आठवड्यात चौघांचा मृत्यू : संघटना आंदोलनांच्या पवित्र्यात
लक्षवेधी मुद्दे
एकूण मृतांमध्ये मुंबई, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व बेळगाव जिल्ह्यातील जवळपास 74 व्यक्तींचा समावेश.
ग्रामीण भागातील अतिगंभीर रुग्णांचा कोल्हापुरात उपचारांवेळी मृत्यू झाला.
कोरोनाबाधितांची एप्रिलमधील मृतांची दिवसनिहाय संख्या अशी
तारीख : कोरोना मृतांची संख्या : कोरोनाबाधित संख्या
1 ------4 ------ 122
2-------5 ------110
3-------4------188
4-------3 ------96
5-------4-------111
6-------6-------231
7-------4--------288
8-------3--------167
9-------2--------277
10------5-------311
11------6-------367
12-----11-------308
13------5--------299
14------9-------388
15------7--------293
16-----12--------452
17-----12-------591
18-----15-------594
19-----34-------431
20-----22-------832
21-----22-------817
22-----26-------821
23-----21--------998
24-----31--------784
25-----31--------1071
26-----41---------843
27-----35---------717
28-----32----------969
29-----40--------1122
30-----39-------- 1250
एकूण मृत्यू : 450
एकूण कोरोनाबाधित : 15,254
Edited By- Archana Banage
Web Title: One Month Covid Infected Died In 450 Kolhapur Report Covid 19 Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..