esakal | एसटी कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात;आठवड्यात चौघांचा मृत्यू : संघटना आंदोलनांच्या पवित्र्यात
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात;आठवड्यात चौघांचा मृत्यू : संघटना आंदोलनांच्या पवित्र्यात

एसटी कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात;आठवड्यात चौघांचा मृत्यू : संघटना आंदोलनांच्या पवित्र्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाची बाधा झालेले एसटी महामंडळाच्या चार कर्मचाऱ्यांचा एका आठवड्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे कर्मचारी हादरले आहेत, अशा स्थितीत एसटी प्रशासनाने यंत्र शाळेत शंभर टक्के कर्मचारी हजेरीचा आदेश काढला. त्याला संघटनात्मक पातळीवर विरोध होत आहे. राज्यभरातील 178 कर्मचाऱ्यांचा कोरोनाबाधेमुळे मृत्यू झाला आहे. दहा मृतांचा अपवाद वगळता कोणालाही विमा मिळाला नाही. तरीही एसटी प्रशासन गांभिर्याने दखल घेत नसल्याने कर्मचारी संघटना आंदोलनांच्या पवित्र्यात आहेत.

मध्यवर्ती बसस्थानकावरील चालक, संभाजीनगर एक वाहक, एसटी बॅंकेची एक महिला कर्मचारी यांचा कोरोनाने मृत्यू झाला तर अन्य एका कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. वर्षभरात कोरोनाचे संकट राज्यभरात आहे, अशा कोरोनाकाळात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यभरातील परप्रांतीय कामगारांना त्यांच्या सीमेपर्यंत सोडले. तर राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना राज्यात त्यांच्या गावी सुरक्षीत पोहचवले. याशिवाय अत्यावश्‍यक सेवेचा भाग म्हणून मुंबईत प्रवासी वाहतुक सुरू ठेवली. तर मध्यंतरी लॉकडाउन शिथील असल्याच्या काळात प्रवासी वाहतुक सुरू होती. त्यानुसार प्रत्येक आगारातून एसटी प्रवासी वाहतुक सुरू होती.

यावेळी रोजच्या 40 ते 50 नव्या प्रवाशांच्या थेट संपर्कात येण्याची वेळ चालक वाहकांना तसेच वाहतुक विभागाच्या कर्मचाऱ्यांवर आली. या सर्व सेवा बजावत असताना अनेक कर्मचारी बाधित झाले. त्यांच्यावर शासकीय कोवीड सेंटर मध्येही उपचार झाले. मात्र काही गंभीर अवस्थेतील कर्मचाऱ्यांचा मात्र कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशात राज्यभरातील दहा कर्मचाऱ्यांच्या नातेवाईंकांना विम्याचा लाभ मिळाला अन्य कर्मचाऱ्यांना मात्र विम्याचा लाभ मिळालेला नाही.

हेही वाचा- कोरोना रुग्णांच्या मृत्युची वाट पहायची का ? आरोग्य राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच ही स्थिती

आंदोलनाचा इशारा

कोरोनाकाळात 15 ते 50 टक्‍क्‍यापेक्षा कमी कर्मचारी कार्यालयात उपस्थित असावेत, असे आदेश राज्य शासनाना दिला आहे. तरीही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व एसटी आगारात शंभर टक्के कर्मचारी उपस्थित रहावेत, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका आहे, ही बाब विचारात घेता शंभर टक्के उपस्थितीचा आदेश मागे घ्यावा, अन्यथा येत्या मंगळवारी काळ्या फितीलावून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे प्रविण म्हाडगुत यांनी दिला आहे.

Edited By- Archana Banage

loading image