
पंडित कोंडेकर
इचलकरंजी : नव्याने स्थापन झालेल्या इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सभागृहात ६५ नगरसेवक असणार आहेत. विसर्जित झालेल्या नगरपालिका सभागृहात ६२ नगरसेवक होते. आता त्यामध्ये तीन नगरसेवकांची जादा भर पडणार आहे. शासनाच्या निर्णयानुसार चार सदस्यीय प्रभाग रचना केली आहे. त्यामुळे किमान १३ हजारपेक्षा जास्त मतदारांचा एक प्रभाग असणार आहे. साहजिकच संपूर्ण प्रभागात प्रभाव असणाऱ्या सक्षम उमेदवारांचा शोध घेताना सर्वच राजकीय पक्षांना घाम फुटणार आहे.