esakal | मेहुल चोक्सीला भारताच्या ताब्यात देणार; एंटिग्वाच्या पंतप्रधानांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

मेहुल चोक्सीला भारताच्या ताब्यात देणार - एंटिग्वा PM

एंटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊनी यांनी सांगितलं की, एंटिग्वा आता चोक्सीला देशात घेणार नाही.

मेहुल चोक्सीला भारताच्या ताब्यात देणार - एंटिग्वा PM

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँक घोटाळा (PNB Scam) प्रकरणातील आरोपी असलेला मेहुल चोक्सी (Mehul Choksi) भारतातून (India) पळून गेल्यानंतर एंटिग्वामध्ये (Antigua) राहत होता. दोन दिवसांपूर्वी तो एंटिग्वातून बेपत्ता झाल्याचं समोर आलं होतं. आता त्याला डोमिनिका सीआय़डीने ताब्यात घेतलं असून लवकरच भारताकडे प्रत्यार्पण केलं जाऊ शकतं. एंटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊनी यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, एंटिग्वा आता चोक्सीला देशात घेणार नाही. डोमिनिकाचे पंतप्रधान आणि तिथल्या पोलिसांना विनंती करण्यात आली आहे की, चोक्सीला पुन्हा एंटिग्वात पाठवू नका. चोक्सीकडे एंटिग्वाचे नागरिकत्व असून त्याच्या आधारावर तो कायद्याचं संरक्षण घेत होता.

चोक्सीने देशातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचे कुटुंबिय एंटिग्वात राहत आहे. ते देशाचे नागरिक असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. बेपत्ता झालेला चोक्सी डोमिनिकामध्ये सापडला. तो अवैध मार्गाने तिथे पोहोचला असावा. डोमिनिका सरकार एंटिग्वा आणि भारत यांच्याशी संपर्कात आहे. त्याला आता एंटिग्वात पाठवू नये अशी विनंती डोमिनिका सरकारकडे केली आहे. त्याला आता थेट भारतात पाठवण्याची व्यवस्था करण्यात यावी असंही ब्राऊनी यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.

हेही वाचा: अमेरिकेत गोळीबार; 8 जण ठार, हल्लेखोराने स्वत:ला संपवले

सोमवारी घरातून पळाला

सोमवारी मेहुल चोक्सी घरातून एका रेस्टॉरॉंटमध्ये जाण्यासाठी गेला. मात्र त्यानंतर परत आलाच नाही. याबाबत स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, हीरे व्यावसायिक मेहुल चोक्सीची कार जॉली हार्बरमध्ये सापडली. मात्र मेहुल चोक्सी त्यात नव्हता.

भारतीय तपास संस्थांसाठी वाँटेड

हिरे व्यावसायिक आणि गीतांजली समुहाचा मालक असलेल्या मेहुल चोक्सीला सीबीआय आणि ईडीने वाँटेड घोषित केलं आहे. मेहुल चोक्सीने घोटाळा उघडकीस येण्याआधी 4 जानेवारी 2018 ला देशातून पलायन केलं. त्याने एंटिग्वा जाण्याआधी 13 हजार 578 कोटींचा पीएनबी घोटाळ्यात तब्बल 7 हजार 80 कोटींचा फेरफार केला.पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात चोक्सीविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. 2013 मधील शेअर बाजार घोटाळ्यातही त्याचे नाव होते.

हेही वाचा: ‘एमजीएम’चा खजिना ‘ॲमेझॉन’कडे

पीएनबीमध्ये घोटाळ्यानंतर तो देश सोडून पळाला होता. गेल्या वर्षी एक आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून ईडीने असा दावा केला होता की, चोक्सीने फक्त भारतीय बँकांनाच नाही तर दुबई आणि अमेरिकेतील ग्राहक आणि कर्जदारांची फसवणूक केली आहे. त्याची अडीच हजार कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.