
कोल्हापूर : कोल्हापूरच्या क्रीडा प्रबोधिनीत कुस्तीचा कोटा २० अन् पैलवान मात्र आठ, अशी स्थिती झाली आहे. प्रबोधिनीसाठी एकूण १७ पैलवानांची निवड झाली होती. त्यातील १० जण प्रबोधिनीकडे फिरकलेच नाहीत. नेमबाजीचा कोटा २० असून, केवळ एकच खेळाडू नेमबाजीचे धडे गिरवत आहे.