
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठात सहा विभाग असे आहेत की ज्यामध्ये आता केवळ एकच प्राध्यापक किंवा सहाय्यक प्राध्यापक आहेत. बाकी या विभागांचे काम कंत्राटी प्राध्यापकांवरच चालते. अजून कंत्राटी प्राध्यापकांच्या कंत्राटाचे नूतनीकरण न झाल्याने सध्या ते विभागात येत नाहीत. पर्यायाने विभागाची धुरा ही त्या एकेका प्राध्यापकावरच आहे.
शिवाजी विद्यापीठातील कंत्राटी प्राध्यापकांचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आहे. या प्राध्यापकांच्या बाबतीत विद्यापीठाने अत्तापर्यंत निर्णय घेतला नव्हता. अत्ता तीन महिन्यांसाठी त्यांचे कंत्राट नूतनीकरण करण्यात येणार आहे. मात्र अद्याप ते झालेले नाही. तोपर्यंत बऱ्याचशा विभागातील प्राध्यापक निवृत्त होत आहेत.
पर्यावरणशास्त्र, विधी अधिविभाग, हिंदी विभाग, औद्योगिक रसायनशास्त्र, उपयोजीत रयासनशास्त्र आणि इतिहास विभाग येथे एकच प्राध्यापक किंवा सहाय्यक प्राध्यापक कार्यरत आहेत. तेथे असणाऱ्या कंत्राटी प्राध्यापकांची मुदत संपल्याने तेही त्यांच्या मदतीला नाहीत. त्यामुळे अधिविभागातील सर्व कामे या प्राध्यापकांनाच करावी लागतात. अहवाल बनवणे, वर्षभराचे नियोजन करणे, प्रशासकीय कामे करत आहेत. यातील काही अधिविभागात क्लार्क देखील नाहीत. त्यामुळे क्लार्कचे काम तेथील संशोधक विद्यार्थी करतात. आपल्या संशोधनाच्या कामातील काही तास त्यांना या कामासाठी द्यावे लागतात. यातील काही विभाग हे स्वयं अर्थसहाय्यावर चालणारे आहेत. येथील अभ्यासक्रम शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या रक्कमेचे शुल्क भरावे लागते. जर येथे पूर्णवेळ प्राध्यापकांची नियुक्ती केली गेली नाही तर पैसे भरूनही शिक्षक नसणे हा विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे.
नॅक समितीच्या मूल्यांकनावेळीदेखील विद्यापीठात किती प्राध्यापक आहेत यावरही मुल्यांकनातील काही गूण अवलंबून असतात. नॅकच्या परीक्षापर्यंत जर रिक्त पदे भरली गेली नाहीत. तर याचा परिणाम स्वाभाविकपणे गुणांवर होणार आहे. या सर्व समस्या लक्षात घेऊन विद्यापीठाने कंत्राटी प्राध्यापकांची संख्या वाढवणे आवश्यक आहे.
विद्यापीठातील प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. सध्या कार्यरत असणाऱ्या कंत्राटी प्राध्यापकांना तीन महिन्यांची मूदतवाढ देण्याचा निर्णय अधिकार मंडळाने घेतला आहे. त्यानंतरही कंत्राटी प्राध्यापकांबाबत लवकर निर्णय घेऊ.
- प्रा. डॉ.विलास नांदवडेकर, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.