चंदगड : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत (Operation Sindoor) सात मे रोजी हल्ले चढविले. पाकिस्तानने दुसऱ्या दिवशी भारतीय सीमांवर ड्रोन हल्ले केले. भारतीय संरक्षण दलाने (Indian Defense Force) हे सारे ड्रोन हल्ले निकामी केले. या अभिमानास्पद कामगिरीत चंदगड तालुक्यातील मलतवाडी येथील जवान सचिन नामदेव पाटील यांनी या रडार यंत्रणेचे नेतृत्व केले. त्यांनी पाकिस्तानचे नऊ ड्रोन अचूक टिपले आणि पाकिस्तानच्या नापाक इराद्यांना सडेतोड उत्तर दिले.