"आजरा' व्यवस्थापनातर्फे चालवण्यासाठी संधी, मात्र गरज थकहमीची

Opportunity To Run By Ajara Factory Management Kolhapur Marathi News
Opportunity To Run By Ajara Factory Management Kolhapur Marathi News

आजरा : आजरा कारखाना चालवण्यास देण्यासाठी जिल्हा बॅंकेने दोन वेळा निविदा काढून देखील प्रतिसाद न मिळाला नाही. कारखाना चालवण्यास घेण्यासाठी आलेल्या एकमेव पार्टीकडूनही बॅंकेच्या धोरणाप्रमाणे पुरेशी सक्षमता दाखवली गेली नसल्याचे समजते. त्यामुळे कारखान्याच्या भवितव्यावर प्रश्‍नचिन्ह तयार झाले आहे. या कारखान्याचे चक्र फिरते राहावे यासाठी सर्वकष पातळीवर प्रयत्नांची गरज आहे. दरम्यान, हा कारखाना पुर्वीप्रमाणे व्यवस्थापनातर्फे चालवण्यासाठी संधी निर्माण झाली आहे. पण यासाठी राज्य शासनाच्या थकहमीची गरज आहे. ती मिळावी यासाठी चेंडू सध्या जिल्हा बॅंकेच्या कोर्टात आहे. शुक्रवार (ता. 25) जिल्हा बॅंक संचालकांची बैठक होत असून याबाबत काय निर्णय होतोय याकडे तालुकावाशियांचे लक्ष लागून आहे. 

जिल्हा बॅंकेने थकीत कर्जापोटी कारखाना ताब्यात घेवून तो चालवण्यास देण्यासाठी प्रक्रीया सुरू केली. दोन वेळा निविदा काढून देखील त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. कारखाना चालवण्यास घेण्यासाठी पुणे येथील एक पार्टी पुढे आली आहे. दरम्यान, हा कारखाना व्यवस्थापनातर्फे पुर्वीप्रमाणे चालवण्यास घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पण बॅंकेचे थकीत कर्जाची अडचण मोठी आहे. यंदाचा गळीत हंगाम साधावयाचा असेल, तर जिल्हा बॅंकेकडून आर्थिक मदतीबरोबर शासनाची थकहमी मिळणे आवश्‍यक बनले आहे. 

मे महिन्यात जिल्हा बॅंकेने 103 कोटींच्या कर्जापोटी कारखाना ताब्यात घेतला. दरम्यान, साखर विक्रीतून कर्जाची रक्कम गेल्याने बॅंकेचे 74 कोटीचे कर्ज राहील्याचे समजते. त्याचबरोबर सुमारे 20 कोटीची साखर शिल्लक आहे. तसेच निर्यात अनुदान व अन्य बाबीतूनही पैशाचा परतावा होवू शकतो. त्यामुळे कारखाना यंदा व्यवस्थापनातर्फे चालवण्याच्यादृष्टीने काही अंशी संधी उपलब्ध झाली आहे. पण याबाबतचा निर्णय जिल्हा बॅकेवर अवलंबून आहे.

कारखाना, बॅंक व शासनस्तरावर एकाच विचाराचे लोक कार्यरत आहेत. त्यामुळे कारखान्याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्‍यता आहे. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी कारखाना चालवण्याच्या नियोजनाबाबत आराखडा व्यवस्थापनाकडे मागितला आहे. तो दिला असून त्यादृष्टीनेही बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते. 

कारखाना चालू राहण्याबाबत आशा 
यंदा ऊसाचे चांगले पिक आहे. त्यामुळे यंदा कारखाना सुरू होणे सर्वांच्या हिताचे आहे. शासन देखील राज्यातील सहकारी कारखाने सुरू रहावेत यासाठी प्रयत्नशील असून काही अटी शिथील केल्या आहेत. आजरा कारखान्याचे सभासद शेतकरी, कामगार व वाहतुकदार आजरा चालु राहण्याची आशा बाळगून आहेत. 

दृष्टीक्षेप 
- 103 कोटींच्या कर्जापोटी कारखाना जिल्हा बॅंकेकडे 
- सध्या बॅंकेचे 74 कोटीचे कर्ज राहील्याची माहिती 
- कारखान्याकडे सुमारे 20 कोटीची साखर शिल्लक 
- निर्यात अनुदान, अन्य बाबीतूनही पैशाचा परतावा शक्‍य 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com