कोल्हापुरात ट्रॅक्‍टर रॅलीने केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध 

opposition to the centres agriculture law in kolhapur
opposition to the centres agriculture law in kolhapur
Updated on

कोल्हापूर - केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी आणि कामगारांच्या विरोधातील तीनही कायदे जोपर्यंत मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत शांत बसणार नाही, असा निर्धार आज ट्रॅक्‍टर रॅलीच्या समारोपावेळी करण्यात आला. तसेच "हरियाना' आणि "पंजाब' प्रमाणेच महाराष्ट्रात सुद्घा हे कायदे राबविला जाणार नसल्याचाही ठाम निर्धार येथे करण्यात आला. खोटे पॅकेज देणारे सरकार नको तर शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या हिताचे सरकार पाहिजे, यासाठी तालुकापातळीवर, गल्लोगल्ली याबाबत माहिती देण्याचे काम पुढील काळात केले जाईल,असेही नेत्यांनी भाषणातून स्पष्ट केले. 

केंद्र शासनाने कृषी विषयक केलेले तीनही कायदे रद्द करण्यासाठी आज कॉंग्रेस पक्षाच्यावतीने ट्रॅक्‍टर रॅलीचे आयोजन केले होते. सुमारे हजार ट्रॅक्‍टरसह सकाळी अकरा वाजता संभाजीनगरातील निर्माण चौकातून सुरू झालेली ट्रॅक्‍टर रॅलीची सांगता दुपारी एकच्या सुमारास दसरा चौकात झाली. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील, प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री आणि गृहराज्य मंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्‍वजीत कदम,महापौर निलोफर आजरेकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय कॉग्रेसच्या कोमल पटेल, आमदार पी.एन.पाटील, चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील,राजूबाबा आवळे यांच्यासह कॉग्रेसचे नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

केंद्र सरकारने चोरून, रात्रीच्या अंधारात, विरोधी आमदारांची मुस्कटदाबी करून, त्यांना निलंबित करून हे तीन कायदे पारित केले आहेत. त्यामुळेच त्याला विरोध करण्यासाठी देशभर ट्रॅक्‍टर रॅली काढली जात असल्याचे महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले,की खोटे बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या हिताविरोधात कायदे केले आहेत. आत्मनिर्भर शेतकऱ्यांसाठी कंपनी शेतीचा कायदा आणला, मार्केट कमिटीचे अस्तीत्व नाहीसे करणे एवढंच नव्हे तर न्यायालयात दाद न मागण्याचाही कायदा या खोटे पॅकेज जाहीर करणाऱ्या मोदी सरकारने आणला आहे. त्याला विरोध करण्यासाठी सर्व शेतकरी एकत्रित आले. हरियाना पंजाब नंतर कोल्हापुरात अशी मोठी ट्रॅक्‍टर रॅली निघाली आहे. ही एक ठिकणी येथे पडली आहे. आता ती दिल्लीपर्यत पोचवायची आहे. बिहारच्या निवडणुकीतील सभेत मोदींच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यातून सरकारला हा इशारा आहे. आता शेतकऱ्यांना आणि कामगारांनाही त्याचे खोटे पॅकेज आणि भांडवलशाहींना, उद्योजपतींना झुकते माप दिला जाते हे समजून आले आहे. त्यामुळे पंजाब अणि हरियानानंतर महाराष्ट्रात सुद्धा हे कायदे लागू करून देणार नाही. जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत शांत बसणार नाही. 

मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही हे कायदे महाराष्ट्रात लागू करू देणार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, की समतेचा राजा राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्यभूमीतून ट्रॅक्‍टर रॅली निघाली आहे. येथून पेटलेली ज्योत आता दिल्लीपर्यंत जाणार आहे. कोल्हापूर-सांगलीत महापूर आला होता तेंव्हा भाजपाचे सरकार होते. त्यांची नुकसान भरपाई आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर दिली. पालकमंत्री सतेज पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतली. चक्रीवादळ आले, मराठवाड्यात महापूर आला.

कोरोनाकाळातही आम्ही जनतेच्या शेतकऱ्यांच्या, कामगारांचे हितेचे धोरण अवलंबिले. मात्र भाजपा सरकारने शेतकरी-कामगारांच्या विरोधात कायदे करून त्यांना न्यायालयात तक्रार सुद्धा करण्याचे स्वतंत्र ठेवले नाही. त्यामुळेच हे तीनही कायदे महाराष्ट्रात लागू केले जाणार नाहीत. 

कृषीराज्य मंत्री विश्‍वजित कदम यांनीही अत्याचारी, शेतकरी विरोधी असलेल्या भाजप सरकारने केलेल्या कायद्याची भिषणता सांगून कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात हे कायदे लागू करू देणार नसल्याचे स्पष्ट केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र शासनाने कशा पद्धतीने मुस्कटदाबी करून हे कायदे आणले त्याची माहिती दिली. पालकमंत्री आणि जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनीही भाजपा सरकारवर टिका करीत शेतकरी आणि कामगारांच्या हिताचे कायदे होते तर ते गुपचूप का आणले असा सवाल केला. जी.एस.टी, नोटा बंदी नंतर आता शेतकरी आणि कामगारांचा गळ्या घोटण्याचे काम या भाजपा सरकारने केल्याचे सांगून त्याला विरोध करण्यासाठी ही ट्रॅक्‍टर रॅलीचे आयोजन केल्याचे सांगितले. जोपर्यंत कायदे रद्द होणार नाहीत तोपर्यंत पक्ष श्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली हा लढा सुरू ठेवण्याचाही निर्धार येथे केला. यावेळी आमदारांसह इतर पदाधिकाऱ्यांचीही भाषणे झाली. 
 
कोल्हापुरातील ठिणगी दिल्लीत पोचते, त्यामुळे आता ही ठिणगी पडली आहे. दिल्ली हलविल्याशिवाय ती थांबणार नाही, असा विश्‍वास नेत्यांनी व्यासपीठावरून व्यक्त करताच एकच टाळ्या वाजत होत्या. टळटळीत उन्हात सुद्धा शेतकऱ्यांनी रॅलीत सहभागी होऊन भाजपा सरकारच्या विरोधात एकमुठ केली. 

हे पण वाचा - तरुणीने पंचगंगेत उडी मारताच घाबरलेल्या प्रियकराने क्षणाचाही विचार न करता थेट पाण्यात घेतली उडी  
 
पालकमंत्री आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील हे स्वतः ट्रॅक्‍टर चालवत व्यासपीठाकडे आले. ट्रॅक्‍टर रॅलीचे नेतृत्व त्यांनी ट्रॅक्‍टर चालवून केले. जिल्ह्यातील सर्व तालुकयांतील सुमारे हजार ट्रॅक्‍टर येथे असल्याचेही व्यासपीठावरून नेत्यांनी जाहीर केले. काही ट्रॅक्‍टर दसरा चौकातील मैदानावर, व्यासपीठासमोरही उभे केले होते. 
 
केंद्रात असलेले भाजपा सरकार आता कांदा पाकिस्थानातून आणणार असल्याचे माझ्या कानावर आले आहे. कांदा निर्यातीला बंदी घातली आणि असे एक एक निर्णय शेतकऱ्यांच्या विरोधात घेतले जात आहेत. कंपनी पद्धतीने शेती करणे आपल्या अल्पभूधारकांना शक्‍य नाही. त्यामुळे याला विरोध करायला हवा, असेही आवाहन येथे मंत्री थोरात यांनी केले. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com