रोज बाराशे भुकेलेल्यांसाठी ही संस्था ठरते आधारवड

रोज बाराशे भुकेलेल्यांसाठी ही संस्था ठरते आधारवड
Updated on

कोल्हापूर  : येथील महालक्ष्मी अन्नछत्रात एरवी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भोजनाची धांदल सुरू असते. मात्र, आता अन्नछत्र बंद असले तरी महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टच्या वतीने शिवभोजन हा उपक्रम सुरू आहे आणि त्याशिवाय संचारबंदीमुळे विविध ठिकाणी थांबून राहिलेल्या गरजू लोकांसाठी सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही सत्रात त्या त्या ठिकाणी जावून भोजनाची पॅकेटस्‌ ट्रस्टचे स्वयंसेवक पुरवत आहे. त्यासाठी रोज किमान शंभर किलो तांदूळ येथे शिजतो आहे. 
दरम्यान, रोज किमान एक हजार ते बाराशे लोकांच्या भोजनाची व्यवस्था ट्रस्टच्या माध्यमातून सुरू आहे. "भक्ती परमेश्‍वराची आणि सेवा मानवाची' हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेला हा ट्रस्ट कोरोनाच्या संचारबंदी काळातही भुकेलेल्यांसाठी आधारवड ठरतो आहे.

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे आणि एकूणच संचारबंदीमुळे गेली महिनाभर अन्नछत्र बंद आहे. मात्र, सुरवातीच्या टप्प्यात येथील शिवभोजन उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर समाजातील विविध गरजू लोकांसाठी ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. 

अन्नछत्र बंद असले तरी येथील सर्व कामगारांना मासिक वेतनासह इतर लाभ ट्रस्टने कायम ठेवले आहेत. सध्या सुरू असलेल्या उपक्रमात कामगारांसाठी विविध शिफ्टमध्ये कामाचे नियोजन केले आहे. महालक्ष्मी धर्मशाळेच्या हॉलमध्ये सकाळपासूनच धांदल सुरू होते. दुपारी दोनपर्यंत सकाळच्या सत्रातील सर्व भोजनाची पॅकेटस्‌ पुरवली जातात तर सायंकाळी साडेसहानंतर पुन्हा सर्वत्र पॅकेटस्‌चे वितर केले जाते. चपाती, भात, मिक्‍स भाजी, आमटीचा त्यामध्ये समावेश असतो. त्यासाठी शंभर किलो तांदूळ, वीस किलो तूरडाळ, तेल दोन डबे, दहा किलो मसाले आणि पन्नास किलो भाजी आदी साहित्य लागते, असे आचारी शरद काकिर्डे यांनी सांगितले. 


समाजातील विविध गरजूंसाठी अन्नछत्रातर्फे भोजनाची व्यवस्था केली आहे. त्यासाठी अन्नछत्राचे सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी झटत आहेत. भोजन तयार झाल्यानंतर त्याचे अगदी व्यवस्थितपणे सर्व नियमांचे पालन करून पॅकिंग केले जाते आणि त्याचे वितरण त्या त्या ठिकाणी जावून केले जाते. 
- राजू मेवेकरी, अध्यक्ष, महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्ट  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com