
लहानपणीच आई-वडिलांचं छत्र गमावल्यानं पोरका झाला. आजोबांना एकट्यानं सांभाळणं कठीण होतं. त्यामुळे अनाथ झालेल्या बाळाला आजोबांनी सांगलीत एका बालगृहात दाखल केलं. तिथं चांगलं शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षा देत आतापर्यंत १० सरकारी अधिकारी पदाच्या परीक्षेत यश मिळवलं. तरीही चांगल्या पदावर जायचं स्वप्न सोडलं नाही. शेवटी क्लासवन पदाची नोकरी मिळवूनच गप्प बसला. योगेशकुमार पुस्तके असं तरुणाचं नाव आहे. तो सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून सरकारी सेवेत रुजू होत आहे.