
सह्याद्रीच्या कुशीत अतिक्रमणे चंदगड ते शाहूवाडीपर्यंत दीड हजारांवर अतिक्रमित फार्महाउस
esakal
ठळक मुद्द्यांचा सारांश:
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाशी जोडलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील जंगल पट्ट्यात गेल्या दहा वर्षांत दीड हजारांहून अधिक अतिक्रमणे झाली असून, पर्यटन आणि व्यावसायिक कारणांनी जंगलाच्या परिसंस्थेला धोका निर्माण झाला आहे.
जंगलालगत बांधलेली हॉटेल्स, फार्महाऊसेस आणि इतर व्यवसायांमुळे वाहनांची वर्दळ, प्रदूषण आणि सांडपाण्यामुळे वन्यजीवांचे अधिवास धोक्यात आले आहेत.
वन्यजीवांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी शेती सोडत आहेत, त्यामुळे शेकडो हेक्टर जमीन पडीक झाली असून, त्या विकून श्रीमंत लोक फार्महाउस बांधत आहेत, ज्यामुळे अतिक्रमणाचे संकट वाढत आहे.
Forest In Kolhapur : जंगलाविषयी अनेकांना कुतूहल असते. काहीजण पर्यटनासाठी जंगलात येतात, काहीजण जंगलानजीक फार्महाउस उभारतात, तर काही ठरावीक प्रेक्षणीय स्थळांच्या परिसरात व्यावसायिक दुकाने थाटतात. अशा विविध कारणांनी जंगलाच्या हद्दीत अतिक्रमणे झपाट्याने वाढत आहेत. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे जंगलाला वर्षानुवर्षे पोहोचणारी अप्रत्यक्ष हानी आता गंभीर स्वरूप धारण करू लागली आहे. या समस्येकडे वनविभागाने गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. त्याचा वेध घेणारी मालिका ‘हिरव्या वनाला अतिक्रमणांचा लागलेला डाग’ आजपासून...