
ज्यांच्याकडे कल्पना आहेत, ज्यांच्याकडे नवीन काहीतरी शोधण्याची जिज्ञासा आहे, अशांना आजही उत्तुंग यश घ्यायला शासन हातभार लावते. केवळ व्यवसाय धंदा म्हणून नव्हे, तर नावीन्य कल्पना प्रत्यक्षात रोजगारात आणून दाखवणाऱ्यालाच या स्टार्टअपमध्ये सहभाग मिळतो. केंद्र शासनाने स्टार्टअप ही योजना २०१६ मध्ये जाहीर केली. याचा लाभ अनेकांनी घेत प्रगती साधली आहे.
लुमाकांत नलवडे
कोल्हापूर : जिल्ह्यात केवळ शिवाजी विद्यापीठात ६५ हून अधिक स्टार्टअपची नोंदणी असून, ४० हून अधिक नोंदणी प्रक्रियेत आहेत. आजपर्यंत आठ प्रकल्पांना दोन कोटी ३५ लाखांहून अधिक बीज भांडवल आणि अर्थसाहाय्य झाले आहे. नावीन्यपूर्ण कल्पना सूचवा, त्यासाठी केंद्र शासनाकडून मदत, अनुदान, कर्ज घ्या आणि तुमचा व्यवसाय सुरू करा. ‘नोकरी मागू नका, नोकरी द्या’ असा संदेश स्टार्टअप योजनेने दिला आहे.