

Dr D Y Patil Passed Away kolhapur
esakal
Former Governor D Y Patil : शिक्षणसम्राट, पद्मश्री आणि माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांचे मंगळवारी कोल्हापूर येथे निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. आमदार सतेज पाटील आणि उद्योगपती संजय पाटील यांचे ते वडील होत.