

Artists capture the scenic beauty of Panchganga Ghat
sakal
कोल्हापूर : प्रत्यक्ष निसर्ग चित्रणाची परंपरा कायम ठेवताना येथील चित्रकार शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष निसर्गचित्रण करू लागले आहेत. पस्तीसहून अधिक चित्रकारांचा या उपक्रमात समावेश आहे. जलतीर्थ स्वच्छता मोहिमेत ही मंडळी सहभागी होणार असून, शनिवारी (ता.२१) पंचगंगा घाटाचे सौंदर्य ते कॅनव्हासवर उलगडणार आहेत.