Kolhapur Rain Update : पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली, जिल्ह्यातील ४१ मार्गांवर पाणी; राधानगरी धरणाचे ५ दरवाजे बंद, असा आहे पावसाचा अंदाज?
कोकणातील वाहतूक आंबोलीमार्गे
आंबोली वगळता कोल्हापूरचा कोकणशी संपर्क तुटला
लोंघे व मांडुकली येथे पाणी आल्याने गगनबावडा मार्ग ठप्प
फेजीवडे येथे पाणी आल्याने राधानगरी मार्ग बंद
बाजारभोगाव येथे पाणी आल्याने कळे ते अणुस्कुरा मार्ग बंद
गगनबावडा, राधानगरी राज्य महामार्ग बंद
अणुस्कुरा घाटात दरड कोसळली; वाहतुकीस बंद
Kolhapur Radhanagari Dam : कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस झाला. धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीच्या राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी आज सकाळी ८ वाजता ३९.०७ इतकी झाली. यामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली आहे. सोमवारी पात्राबाहेर पडलेले पंचगंगेच्या पुराचे पाणी आज गायकवाड पुतळ्यापर्यंत आले होते. त्यामुळे शिवाजी पूल ते गंगावेश मार्ग वाहतुकीस बंद झाला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील ४१ मार्ग बंद झाले असून, पर्यायी मार्गांवरून वाहतूक सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ८५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात सरासरी ६५.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

