पंचगंगा धोक्‍याच्या पातळी जवळ ; रेडेडोह फुटला

Panchganga river at danger level
Panchganga river at danger level
Updated on

कोल्हापूर - पंचगंगा नदी धोक्‍याच्या पातळीवर पोहोचली असून आज सकाळी अकराच्या सुमारास रेडेडोह फुटला आहे. यामुळे कोल्हापूर - पन्हाळा मार्ग वाहतुकीस बंद केला आहे. सकाळी 11 वाजता पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी 42 फूट 7 इंच होती. 43 फूट धोका पातळी आहे. तर कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.

पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून सकाळी अकरापर्यंत राधानगरी धरण भरलेले नाही. हे राधानगरी धरण 96 टक्के भरले असून अद्यापही धरणाचे पाणी पंचगंगा नदीत सोडले नाही. तरीही पाणी पातळी धोका पातळी पर्यंत पोचली आहे. आज पर्यंत जिल्ह्यात दोन एनडीआरएफ च्या तुकड्या यापूर्वी दाखल झाल्या आहेत. रात्रीपर्यंत आणखी दोन एनडीआरएफ तुकड्या दाखल होणार असल्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी सांगितले.

शहरासह जिल्ह्यातील अनेक मार्ग वाहतुकीस बंद झाले आहेत. कोल्हापूर - शिये, गंगावेस ते शिवाजी पुल, आजऱ्यातील व्हिक्टोरिया पूल वाहतुकीस बंद आहे, कोल्हापूर-पन्हाळा, जोतिबा मार्ग रस्ता खचल्याने बंद असून पर्यायी गायमुख पासून सुरू आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात आणखी तीन दिवस अतिवृष्टी असणार आहे. शनिवारी काही प्रमाणात पाऊस विश्रांती घेईल मात्र गुरुवार शुक्रवार आणि रविवार या तीनही दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.

स्थलांतर सुरु...

आंबेवाडी,चिखली या गावांतील नागरिकांनी जनावरांसह वेगाने स्थलांतर करण्यास सुरवात केली आहे.दरम्यान कोल्हापूर शहरात आज सकाळ पासुन ऊन - पाऊस असे वातावरण आहे.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ravindra Ghuge Kolhapur Circuit Bench announcement
Maharashtra doctor recruitment 2026
woman dies shortly after delivery in Kagal
Bhushan Gavai latest statement on Kolhapur Circuit Bench
Marathi News Esakal
www.esakal.com