
कोल्हापूर : कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याजवळ आज पंचगंगा नदी पात्रात पाण्यावर मोठ्या प्रमाणात पांढऱ्या रंगाचा फेस दिसला. वळवाच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात सांडपाणी नदीत मिसळले. सांडपाण्यातील डिटर्जंटचे प्रमाण अधिक असेल तर पाण्याला फेस येऊ शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. मात्र, अचानक पांढरा फेस दिसू लागल्याने नदी काठावर असणाऱ्या नागरिकांत गोंधळ निर्माण झाला.