
Kolhapur Monsoon Rain : कोल्हापूर जिल्ह्यात रविवारपासून सुरू असलेल्या दमदार पावसाने आजही जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत रविवारी रात्री नऊ ते सोमवारी रात्री नऊ या चोवीस तासांत नऊ फूट आठ इंचांनी वाढ झाली. यामुळे राजाराम बंधाऱ्यासह जिल्ह्यातील १६ बंधारे पाण्याखाली गेले. सुरक्षिततेच्या कारणास्तव राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली. आज (ता.१७) राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी सकाळी ७.०० वाजता २५ फूट ११ इंच इतकी होती. तर हवामान विभागाने आजही पावसाची शक्यता वर्तविली आहे.