
Kolhapur Dam Levels : गेल्या चार दिवसांपासून विश्रांती दिलेल्या पावसाने जिल्ह्यात आज जोरदार हजेरी लावली. शहरात हलक्या सरी कोसळल्या, तर गेल्या चोवीस तासांत धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात तब्बल अडीच फूट वाढ झाली. दरम्यान, अद्याप आठ बंधारे पाण्याखाली आहेत.