

Kolhapur Flood News Radhanagari Dam Water Level
esakal
Kolhapur Weather Update : कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. राधानगरी धरणात आज ४.३८ टीएमसी म्हणजेच ५२.३३ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर पंचगंगा नदीची पाणीपातळी ८ जुलै सकाळी ८ वाजता ३६ फूट ५ इंच इतकी नोंदविण्यात आली असून ती ३९ फूट इशारा पातळीच्या दिशेने संथ गतीने वाटचाल करत आहे.
नदीतील वाढत्या पाण्यामुळे जिल्ह्यातील ६० बंधारे पाण्याखाली गेले असून अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रशासनाने पर्यायी मार्गांवरून वाहतूक सुरू ठेवली आहे.