
Rain Update Kolhapur : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात दमदार, तर धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली. काही धरणांतून विसर्गही वाढविण्यात आला. त्यामुळे आज दुपारी बाराच्या सुमारास पहिल्यांदाच पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले. नदीकाठच्या गावांना सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे.