Panhala News : पन्हाळा पावनखिंड मार्गावर शिवभक्तांसाठी सुसज्ज निवास व्यवस्था उभारणार - श्रीकांत शिंदे

पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मार्गावर मोहिमेसाठी दरवर्षी जाणाऱ्या शिवभक्तांसाठी पन्हाळगड, खोतवाडी, करपेवाडी, आंबेवाडी, पांढरेपाणी तसेच भातळी येथे सुसज्ज दोन मजली सभागृह बांधले जाईल.
panhala pawankhind
panhala pawankhindsakal

पन्हाळा - पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मार्गावर मोहिमेसाठी दरवर्षी जाणाऱ्या शिवभक्तांसाठी पन्हाळगड, खोतवाडी, करपेवाडी, आंबेवाडी, पांढरेपाणी तसेच भातळी येथे सुसज्ज दोन मजली सभागृह बांधले जाईल.

या पन्हाळगड पावनखिंड विकासाला आराखड्यास नुकत्याच कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. ते पन्हाळा येथे शिवराष्ट्र परिवार संघटनेने आयोजित केलेल्या पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रमी इतिहास घडवला. अनेक मावळ्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले. पावनखिंडचा रणसंग्राम हा एक इतिहासातील महत्त्वाचा अध्याय आहे. वीर बाजीप्रभू देशपांडे, वीर शिवा काशीद, बांदल सेना यांनी आपला पराक्रम गाजवून इतिहासात आपले नाव अजरामर केले.

सिद्धी जोहरच्या वेढ्यातून सुटण्यासाठी धो धो कोसळणाऱ्या पावसातून महाराजांनी विशाळगड जवळ केला. दरम्यान वीर शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल, कृष्णाजी बांदल, विठोजी काटे, शंभूसिंग जाधव यांनी स्वराज्यासाठी आपले बलिदान दिले. स्वराज्यावरची काय निष्ठा असते. ती या शूरवीर मावळ्यांकडून शिकावी.

त्यांचा अजरामर इतिहास तरुणांपर्यंत नेण्याचे काम शिवराष्ट्र परिवार गेल्या 30 वर्षापासून करतो हे अभिमानास्पद आहे. शिवराष्ट्र परिवार तरुणांना आयुष्यात जगण्याची चांगली दिशा देत आहे. अशा मोहिमांमध्ये सहभागी होऊन तरुणांनी राष्ट्र घडवण्यासाठी मोठे योगदान देणे आवश्यक आहे.

यावेळी उपस्थित असलेल्या खासदार धैर्यशील माने यांनी आज शिव छत्रपतीच्या विचाराचे स्वराज्य निर्माण झाले. त्यासाठी पन्हाळा गडाच्या वेढ्यातून महाराजांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम ज्या वीरांनी केले. त्या पराक्रमाला चिरंतर ठेवण्याचे काम या मोहिमेतून केले जात आहे.

यावेळी उपस्थित असलेले आमदार कृतुराज पाटील, माजी आमदार राजेश क्षिरसागर यांनी मनोगत व्यक्तकरत मोहिमेतील सहभागी शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या. तर

मुख्यमंत्री वैद्यकीयचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी मनोगत व्यक्त केले. व शिवराष्ट्र परिवाराचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी इतिहासासह पावनखिंड मोहिमे मागचा उद्देश विशद केला.

या मोहिमेत वीर रायाजी बांदल यांचे वंशज अनिकेत बांदल, सेनापती कान्होजी जेधे यांचे वंशज इंद्रजीत जेधे, बाळासाहेब सनस, करण झावणे-पाटील, मोहीम प्रमुख गणेश कदम, विनायक जरांडे, मोहन खोत, राजेंद्र पवार, विराज साळुंखे, अभिजीत चव्हाण, ऋतुराज चौगुले, शुभम चौगुले, रमेश जाधव, विजय खोत, गजानन परीट, विक्रांत भागोजी, उमेद रजपूत, अभिजीत पवार, अतुल कापटे यांच्यासह देशभरातून ७०० हून अधिक मोहिमेवर सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com