
पन्हाळा : पन्हाळगडच्या प्रवेशद्वारावरील सादोबा तलावाच्या सुशोभीकरणांतर्गत तलावाच्या दक्षिण बाजूकडील भिंतीचे बांधकाम सुरू आहे. याच ठिकाणी शुक्रवारी झालेल्या पावसाने तलावाच्या भिंतीजवळ असलेल्या प्रवासी कर नाका इमारतीच्या पायाजवळील भराव निसटू लागल्याने नाका इमारतीला धोका उत्पन्न झाला आहे, तर पन्हाळगडाच्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या रेडेघाटी कड्यातील शिळा सकाळी मुख्य रस्त्यावर कोसळल्याने पुन्हा एकदा हा रस्ता चर्चेत आला आहे.