

Panhala Rural Hospital Incident Raises Questions
Esakal
राजेंद्र दळवी, पन्हाळा : गेल्या काही वर्षांपासून पन्हाळा ग्रामीण रुग्णालय येथे मिळणाऱ्या वैद्यकीय सेवा, सुविधा व इतर अनेक प्रश्नावरून कायमच चर्चेचा विषय आहेत. यातच आता शनिवारी रात्री ड्युटीवर असलेले वैद्यकीय अधिकारी दिगंबर टोणपे हे मद्यधुंद अवस्थेत आसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरिकांना काय ही पन्हाळा ग्रामीण रुग्णालयाची दशा, येथील डॉक्टरनेच केली नशा असे म्हणण्याची वेळ आली आहे. तर या गंभीर निष्काळजीपणामुळे येथील रुग्णसेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.