Doctor Found Drunk on Duty at Panhala Rural Hospital
esakal
पन्हाळा (कोल्हापूर) : गेल्या काही वर्षांपासून पन्हाळा ग्रामीण रुग्णालय येथे मिळणाऱ्या वैद्यकीय सेवा, सुविधा व इतर अनेक प्रश्नांवरून कायमच चर्चेचा विषय ठरत (Panhala Hospital Negligence) आहे. त्यातच शनिवारी रात्री ड्यूटीवर असलेले वैद्यकीय अधिकारी दिगंबर टोणपे हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळे रुग्णाला नर्सकडून प्रथमोपचार घेऊन कोल्हापूरला हलवावे लागले. डॉक्टरांच्या या निष्काळजीपणामुळे येथील रुग्णसेवेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.