'पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती' मोहीम रद्द

'पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती' मोहीम रद्द
Updated on: 

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गतवर्षीप्रमाणे यंदाही 'पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती' (Panhala to Pawankhind Walking campaign)मोहीम रद्द करण्याचा निर्णय कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माऊंटेनियरिंगअसोसिएशनच्या मध्यवर्ती समन्वय समितीतर्फे घेण्यात आला. जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी परवानगी दिली तर शाहूवाडी(shahuwadi)येथील स्थानिक गावकऱ्यांतर्फे पावनखिंडीत प्रतिकात्मक पूजन करण्यात येईल, असे सांगण्यात आले. शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात बैठक झाली.(panhala-to-pawankhind-walking-campaign-canceled-kolhapur-news)

असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमर अडके म्हणाले, "कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. गतवर्षी कोरोनामुळे मोहीम रद्द करावी लागली. असोसिएशनशी संलग्न ७४ संघटनांनी त्यास प्रतिसाद देत मोहीम स्थगित केल्या सुमारे ५० हजार मोहीमवीर मोहिमेत सहभागी होतात. यंदा मोहीम रद्द केली असून, संघटना ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे घेणार आहेत. दृकश्राव्य माध्यमातून 'पन्हाळा ते पावनखिंड' रणसंग्राम वर आधारित माहिती जगभरातल्या शिवप्रेमींना दाखवली जाणार आहे.

"ते म्हणाले, "पन्हाळा ते पावनखिंड रणसंग्रामाच्या मार्गावर सोळा वाड्या-वस्त्या येतात. तेथे कोरोनाचा संसर्ग वाढून नये, याची जबाबदारी घेणे महत्त्वाचे आहे. शिवरायांची शिकवण लक्षात घेता आपल्या बांधवांना त्रास होऊ नये, याकरिता यंदाची मोहीम होणार नाही. प्रशासनालाही आम्ही त्याकरिता सहकार्य करत आहोत."

याप्रसंगी एव्हरेस्ट मोहीम करणाऱ्या कस्तुरी सावेकर हिचे अभिनंदन करण्यात आले. तसेच तिने येत्या काळात ही मोहीम फत्ते करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी हेमंत साळोखे, पंडित पोवार, सागर पाटील, विनोद साळोखे, विजय ससे, साताप्पा कडव, राजेश पाटील, रामदास पाटील, दीपक सावेकर, सदाशिव पाटील, उमेश कोडोलीकर, विश्वनाथ भोसले उपस्थित होते.

मोहिमेसाठी परवानगी घ्यावी लागेल....

अमरनाथ यात्रेला यात्रेकरू मोठ्या पवित्र भावनेने जातात. पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेत रणसंग्रामाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हीच भावना असते. त्यामुळे पुढील वर्षीपासून पावनखिंड मोहीमेत सुसूत्रता आणण्यासाठी 'पावनखिंड संग्राम मध्यवर्ती समन्वय समिती' एक आचारसंहिता व आदर्श नियमावली तयार करेल. या समितीकडून मोहिमेकरिता परवानगी घेऊन आयोजन करावे लागेल, असे डॉ. अडके यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Madhuri the elephant, whose rehabilitation at Vantara is being sought again by PETA India through the Supreme Court
Gokul Milk Union Election Mahayuti Seat-Sharing Formula
Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Marathi News Esakal
www.esakal.com