esakal | पन्हाळा ग्रामस्थ आक्रमक! वीकेंड लॉकडाउन ,मग जिल्हा परिषद सदस्य का?
sakal

बोलून बातमी शोधा

वीकेंड लॉकडाउन ,मग जिल्हा परिषद सदस्य का?

वीकेंड लॉकडाउन ,मग जिल्हा परिषद सदस्य का?

sakal_logo
By
आनंद जगताप

पन्हाळा (कोल्हापूर) : सोमवारी जिल्हापरिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड आहे. नेत्यांनी आज आपल्या पार्टीच्या सदस्यांना येथील एका हॉटेलमध्ये येण्याचा आदेश दिला आहे, नेते उद्या रविवारी त्यांची मुलाखत घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर गडावरील नागरिकांत असंतोष पसरला आहे, यासाठी त्यांनी येथील प्रवासी कर नाक्यावर थांबून बाहेरच्या कुणालाही न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पन्हाळा (panhala) पर्यटकांसाठी बंद,तालुक्यातून कामांसाठी येणाऱ्या पक्षकारांची तपासणी,मग राजकीय लोकांना प्रवेश का? हा त्यांचा सवाल असून पन्हाळा सर्वांसाठी खुला करा, नाही तर सर्वांनाच बंद करा अशी आग्रही मागणी आहे.

हेही वाचा- जिद्द असावी तर अशी! चहा दुकान, कॅफे ते जाहिरात कंपनीचा मालक; अभिजीतचा थक्क करणार प्रवास

दरम्यान रविवारी येथे येणाऱ्या मंत्र्यांना येथील छोट्या व्यावसायिक तसेच ग्रामस्थामार्फत निवेदन देण्यात येणार असून पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या लोकांना हातभार लावण्याची , तसेच पन्हाळा खुला करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

loading image