

पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती बंद? ‘सारथी’कडून प्रक्रियेचा प्रारंभ नाही...
esakal
SARTHI Scholarship Delay : ‘सारथी’ ची २०२१ पासून सुरू केलेली पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना ही मराठा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी ३०० विद्यार्थ्यांना देशातील महत्त्वाच्या २०० उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षणासाठी सहाय दिले जाते; पण गेल्यावर्षी अर्ज संख्या ५८० इतकी होती. त्यापैकी केवळ २६४ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.