
नंदिनी नरेवाडी
कोल्हापूर : सध्या आई-वडील दोघेही नोकरी, व्यवसाय करतात. यातून मुलांना वेळ कसा द्यायचा? त्यांचा स्क्रीन टाईम कसा कमी करायचा?, मुलांच्या शिक्षणासाठी कोणते माध्यम, बोर्ड निवडायचा, मुली असतील तर बाहेर पडल्यावर त्या सुरक्षित राहतील का? आणि मुलांना वाईट संगत, व्यसन लागणार नाही ना, अशी आव्हाने पालकांसमोर उभी आहेत. अगदी छोटी वाटणारी ही आव्हाने पेलताना पालकांना जबाबदारीचे मोठे ओझे सांभाळत असल्याचा अनुभव येतो. यामुळेच मुलांशी दोस्ती करा, मुलांच्या वयानुसार पालकत्वाची तयारी करा असे सल्ले पालकत्व तज्ज्ञ पालकांना देत आहेत.