
Kolhapur ZP Election
esakal
Kolhapur Political News : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षणाच्या प्रक्रियेकडे राजकीय क्षेत्राचे डोळे लागले आहे. मात्र त्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेसाठी निश्चित करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यावर काही हरकती दाखल करण्यात आल्या होत्या, याबाबत सोमवारी (ता. १५) सुनावणी होणार आहे. दरम्यान, या सुनावणीकडे इच्छुक उमेदवारांचे डोळे लागले आहेत.